Mahayuti Issue 2029 Election Special Report : ३ वर्षांनंतरची निवडणूक; स्वबळाची भाषा, २०२९ ची दिशा?

महाराष्ट्राचं राजकारण इतकं प्रवाही झालंय की दिवस कोणताही असो... वेळ कोणतीही असो.. काही ना काही तरी घडतंच असतं..
आता हे पाहा ना.. गेल्या आठवड्यातच प्रहारच्या बच्चू कडूंनी शिवसेनेत प्रवेश केला.. त्यांना विधान परिषदेची जागाही मिळली.. त्यावर ठाकरेंच्या शिवसेनेनं सामनातून टीका केली.. पण, गोष्ट पोहोचली थेट २०२९ सालच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत.. आणि चर्चा सुरु झाली ती महायुतीतील संघर्षाची..
सामना अग्रलेखात काय?
भाजप भविष्यातील निवडणुका 'स्वबळावर' लढणार आहे. भाजपची गाडी फुल झाली, चढायला जागा नाही.
भाजपची गाडी अजित पवारांचा पक्ष आणि मिंध्यांच्या पक्षाला ठोकर मारून पुढे जाण्याच्या विचारात आहे.
अजित पवारांचा पक्ष गिळण्याची तयारी झाली आहे. उद्या मिंध्यांचे आमदारही भाजपमध्ये जातील.
मिंधे रिकामे होतील तेव्हा आताची समाधी अवस्था सोडून कडू महाराजांसारखे लोक भाजपचा भंडारा उधळतील
फडणवीस, मोदींचा जय करीत दिव्यांगांच्या न्यायासाठी भाजपच्या गाडीस लटकण्याचा प्रयत्न करतील
कडू महाराजांची समाधी म्हणजे मंबाजीचे ढोंग आहे, घसरलेल्या राजकीय पातळीचे चित्र आहे.
विधान परिषदेच्या पायरीवरून कडू महाराज राजकीय वैकुंठप्राप्तीस निघाले आहेत.