निवडणूक निकाल २०२४
(Source: ECI | ABP NEWS)
महाराष्ट्राचा 'मविआ पॅटर्न' युपी, गोव्यात? शिवसेना उत्तर प्रदेश, गोवा विधानसभा लढवणार : Sanjay Raut
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Sep 2021 08:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : शिवसेना उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभेच्या आखाड्यात उतरणार आहे. उत्तर प्रदेशात 80 ते 90 , तर गोव्यात 20 जागा लढवण्याचा शिवसेनेचा विचार आहे, असा खुलासा संजय राऊत यांनी केला आहे. यापूर्वी एनआयए वृत्तसंस्थेनं शिवसेना उत्तर प्रदेश निवडणुकीत 403 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती ट्वीटमार्फत दिली होती. परंतु, संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकींमध्ये शिवसेना 80 ते 90 जागा लढवण्याचा विचार करत असल्याची माहिती दिली आहे.