MVA on Voter list Scam : मतदार याद्यांमध्ये घोळ? निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी Special Report
abp majha web team Updated at: 15 Oct 2025 10:10 PM (IST)
महाविकास आघाडीसह (Maha Vikas Aghadi) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मतदार याद्यांमधील (Voter List) गोंधळावरून निवडणूक आयोगाची (Election Commission) भेट घेतली. 'जे मतदार हयात आहेत आणि त्यांचा मतदानाचा अधिकार हा हिरावून घेतलाय, डिलीट केलेला आहे मग त्यांच्यावरती सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करावा का?' असा सवाल उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केला. जोपर्यंत मतदार याद्या दुरुस्त होत नाहीत, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका, अशी स्पष्ट मागणी राज ठाकरे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी बनावट मतदारांची उदाहरणे देत आयोगाच्या सर्व्हरवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. या सर्व घडामोडींवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी, 'महाविकास ही नाही महा कन्फ्यूज आघाडी आहे', असा टोला लगावला आणि शरद पवारांच्या अनुपस्थितीवरही बोट ठेवले.