Maharashtra Vidhan Sabha : महायुती आणि आघाडी तरी लढाई वन-टू-वन होणार? Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीतील प्रत्येक पक्षाने कंबर कसलीय... जागावाटपासाठी बैठकांचा जोर वाढलाय... प्रत्येकजण काही जागांवर दावे आणि तयारी करताना पाहायला मिळतोय... पण, ज्याप्रकारे दावे केले जातायत ते पाहता विधानसभा निवडणूक काँग्रेस विरुद्ध भाजप, शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट आणि अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशी वन टू वन होण्याची शक्यताय... पाहूयात...
आधी शिवसेना फुटली... नंतर राष्ट्रवादी
फुटली... एकनाथ शिंदेही भाजपला जाऊन
मिळाले आणि अजित पवारही भाजपच्याच
गोटात शिरले... मात्र, महायुती आणि
महाविकास आघाडी असा उघड संघर्ष असूनही
लोकसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध
शिवसेना, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच
लढाई रंगली... तर दुसरीकडे अनेक ठिकाणी
पारंपरिक राजकीय शत्रू आणि राष्ट्रीय पक्ष
असलेल्या भाजप आणि काँग्रेसमध्येच लढाई
रंगल्याचं दिसलं... कशी ते पाहा...