Maharashtra Unlock :महाराष्ट्राची वाटचाल पूर्णत: अनलॉकच्या दिशेने,विस्कटलेली आर्थिक घडी सरळीत होणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Sep 2021 09:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असतानाच आता राज्य सरकारकडून (Maharashtra Govt) अनलॉकची (Unlock) प्रक्रिया सुरु केली जात आहे. राज्य सरकारकडून शाळा, धार्मिक स्थळे, चित्रपटगृहांसोब नाट्यगृहंही सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता 4 ऑक्टोबरला शाळांची घंटा वाजणार आहे तर नवरात्रीच्या (Navratri) पहिल्या दिवशी म्हणजेच 7 ऑक्टोबरपासून सर्व धार्मिक स्थळे उघडली जातील. आणि 22 ऑक्टोबरपासून नाट्यगृहातही तिसरी घंटा ऐकायला मिळणार आहे. यासोबत आता कॉलेजही सुरु करणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.