Maharashtra Unlock: कोरोना काळात शाळा सुरू करणं कितपत योग्य? पालक, विद्यार्थ्यांना नक्की काय वाटतं?
पंकज क्षीरसागर, एबीपी माझा | 29 Jul 2021 09:12 PM (IST)

राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असताना कोरोनाचे निर्बंध शिथिल होणार का? असा प्रश्न आता प्रत्येकजण विचारत आहे. या संदर्भात आता महत्वाची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज (गुरुवारी 29 जुलै) महत्वाची बैठक झाली. यात राज्यातील 25 जिल्ह्यांमधील लॉकडाऊन शिथिल करण्याविषयी चर्चा झाली आहे. निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय.