Maharashtra Uncertain Rain Loss : घोषणांचे ढग नको, मदतीचा पाऊस द्या Special Report
abp majha web team | 29 Nov 2023 10:49 PM (IST)
खरंतर, नोव्हेंबर म्हणजे हुडहुडी भरवणाऱ्या थंडीचा महिना... भर थंडीत भल्या पहाटे शेतात राबणारे शेतकरी आपण याच महिन्यात पाहतो... मात्र आता या शेताच्या बांधांवर डोळ्यांत पाणी घेऊन शेतकरी हताशपणे उभा आहे... आणि त्याला कारण ठरलीय... अवकाळी... यंदा पावसाळा उशिरा सुरू झाला, तोही उणापुराच... त्यामुळे पिकांची राखरांगोळी झाली... आता मात्र शेतकरी रब्बीच्या भरवशावर होता... मात्र अवकाळी आली आणि पिकांचा चिखल झाला... त्यामुळे, घोषणांचे ढग नको, तर मदतीचा पाऊस द्या, अशी मागणी बळीराजा करतोय.... पाहूयात...