Lockdown Effect : लॉकडाऊनमुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट, निर्बंधांमुळे उत्पन्नात घट, पर्याय काय?
वैभव परब, एबीपी माझा | 07 Apr 2021 12:26 AM (IST)
मागच्या महिन्यातील लॉकडाऊनला व्यापारी बांधवांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. आता हळूहळू येथील स्थिती सुधारून लॉकडाऊन खुले होत असतानाच पुन्हा नवे निर्बंध आल्याने व्यापारी आणि नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे. अनेक उद्योग व्यवसाय बंद राहून नुकसान होत आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यासाठी अधिसूचनेतील निर्बंध शिथिल करावेत व व्यापारी बांधवांना त्यांच्या कालावधीत व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.