Maharashtra Rain : आणखी किती नुकसान करणार? राज्यात परतीच्या पावसाचं थैमान Special Report
माधव दिपके Updated at: 17 Oct 2021 10:05 PM (IST)
महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मागे लागलेलं पावसाचं शुक्लकाष्ट काही संपता संपत नाहीए.. याचं कारण पावसाळा सुरु झाल्यापासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालंय.. याचं कारण पावसाळ्यात पुरामुळे पिकांचं नुकसान झालंच. परतीच्या पावसानंही हातातोंडाशी आलेली पिकं हिरावून घेतली.. हे संपत ना संपत तेच मान्सून परतल्यानंतरही पावसाचा कहर सुरुच आहे... आणि त्यामुळे शेतकरी आता हवालदिल झालाय पाहुयात यासंदर्भातला रिपोर्ट वरुणराजास,