राजकारणातील सभ्यता कुठे विरली? मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंबाबत आक्षेपार्ह ट्वीट
abp majha web team | 06 Jan 2022 10:07 PM (IST)

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह टिपणी केल्याप्रकरणी भाजपचे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजरिया यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. पोलिसांच्या सायबर सेलनं जितेन गजरिया यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं आहे. जितेन गजरिया यांनी रश्मी ठाकरेंबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी गजरिया यांना नोटीस पाठवली आहे.