Maharashtra Politics : सुसंस्कृत राजकारणाचं ठाकरे - फडणवीसांकडून दर्शन; युती तुटली, तरी नाती जपली...
विजय केसरकर, एबीपी माझा
Updated at:
30 Jul 2021 10:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर पूरपरिस्थितीचा पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आहेत. दोघांनीही कोल्हापुरातील विविध पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी केली. जिथं मुख्यमंत्री येणार होते तिथेच फडणवीस देखील पोहोचले. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते दोघेही एकाच ठिकाणी शाहुपुरीत भेटले. दरम्यान एकेकाळी राजकीय मित्र असलेले आजी-माजी मुख्यमंत्री एकत्र आले आणि त्यांच्यात संवादही झाला.