Ajit Pawar vs Murlidhar Mohol: ऑलिंपिक असोसिएशनसाठी दादा विरुद्ध अण्णा Special Report
abp majha web team Updated at: 10 Oct 2025 10:22 PM (IST)
महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राजकारण तापलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी थेट आव्हान दिलं आहे. 'ताई तुम्हाला जर फॉर्म भरता येत असेल तर आपण पण भरू शकता, ही लोकशाही आहे,' असं म्हणत अजित पवारांनी या निवडणुकीवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गेल्या १२ वर्षांपासून म्हणजे तीन टर्म अध्यक्ष असलेल्या अजित पवारांना मोहोळांच्या उमेदवारीमुळे कडव्या आव्हानाला सामोरं जावं लागत आहे. २ नोव्हेंबरला पुण्यात ही निवडणूक होणार असून, यात ३० संघटनांचे ६० प्रतिनिधी मतदान करणार आहेत. राजकीय क्षेत्रातील महायुतीचे दोन मोठे नेते खेळाच्या मैदानात आमनेसामने आल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.