Maharashtra Lockdown : राज्यात लाॅकडाऊनमुळे गुन्हेगारांचे 'अच्छे दिन'? कोरोना काळात गुन्हेगारी वाढली
दीपेश त्रिपाठी | 27 Aug 2021 02:28 PM (IST)
कोरोनाच्या प्रादुर्भावाचा चढ-उतार लक्षात घेऊन राज्यात गेल्या दीड वर्षांत टप्प्याटप्यानं लाॅकडाऊन आणि अनलाॅक प्रक्रिया करण्यात आली. सध्या आकडेवारीत घट झाली असली तरी सुद्धा कोविडचा धोका अद्याप टळलेला नाही. याच कालावधीत गुन्हेगारीचं प्रमाण शिखर गाठताना दिसत आहे. मुंबईत गुन्ह्यांचे आकडे झपाट्याने वाढले असून गेल्या दोन वर्षांत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे.