Maharashtra Kesari Special Report : कुस्तीचा आखाडा वादाचा आखाडा, अनेकदा महाराष्ट्र केसरी सामना वादात
abp majha web team | 17 Jan 2023 09:24 PM (IST)
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवरुन सध्या वाद पेटलाय आणि हा वाद आता पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलाय. संग्राम कांबळेंनी फोनवरुन पंचांना धमकी दिल्याचा आरोप करत स्पर्धेच्या आयोजकांनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी तक्रारही दाखल झाली. पण कुस्ती स्पर्धेसाठी हा वाद काही नवा नाहीये. यापुर्वीही स्पर्धेच्या निकालावरुन अनेकदा वाद निर्माण झाला होता.