Maharashtra Heatwave Special Report : राज्यात दिवसेंदिवस 'ताप' वाढताच
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्याचा पारा आजदेखील चढाच राहिलाय... कालच्या प्रमाणेच मुंबई, ठाण्यात आजही उष्णतेची लाट पुन्हा आहे... आणि उष्णतेच्या लाटेमध्ये आज पालघरचा समावेश झालाय... आज ठाण्यात कमाल तापमान ३८.४ अंश सेल्सियस आहे... राज्यात वैशाख वणवा सुरू झालाय... उन्हाचा ताप एवढा वाढलाय साताऱ्यात उष्माघाताचे चार रुग्ण आढळलेत आणि त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत... तिकडे विदर्भात उन्हाचा कडाका वाढत चाललंय... गोंदियात चार दिवसांपासून उन्हाचा पारा वाढत आहेत... आज गोंदियाचं तापमान ४३.२ अंश सेल्सियस आहे...
आठवडाभरापासून राज्यात सूर्य जाळ टाकातोय.... काही ठिकाणी अवकाळी पाऊस, गारपीट... तर दुसरीकडे कडाक्याचं ऊन यामुळे आजारांमध्येही वाढ होतेय....सूर्यदेवाच्या तापामुळे दुपारच्या वेळेत रस्ते सामसूम होत आहेत... घामाच्या धारांनी लोक हैराण झालेत... पाणी आणि शीतपेयांची मागणी वाढलीय...