Maharashtra Special Report : नवा विषय - नवा वाद, पुन्हा एकदा राज्यपाल VS राज्य सरकार!
abp majha web team | 03 Feb 2022 08:36 PM (IST)

राजभवन विरुद्ध महाराष्ट्र सरकार संघर्ष काही नवीन राहिला नाही. आता यात एक नवा अध्याय जोडला गेला आहे. राज्यपालांचे खाजगी सचिव उल्हास मुणगेकर यांच्या नियुक्तीवरून हा वाद सुरू झालाय. मुणगेकर यांची नियुक्ती बेकायदेशीर आहे. असं म्हणत ठाकरे सरकारने राजभवनाकडून खुलासा मागवला आहे. त्यासाठी राज्यपालांच्या 2016 च्या निर्णयाचा दाखलाही दिलाय.