Maharashtra Flood Help : अतिवृष्टी अहवाल...खरं कोण, खोटं कोण? Special Report
Maharashtra Flood Help : अतिवृष्टी अहवाल...खरं कोण, खोटं कोण? Special Report
महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीचा अहवाल केंद्र सरकारला मिळाला की नाही, यावरून आज दिवसभऱ जोरदार संभ्रमनाट्य रंगलं. महाराष्ट्रानं असा काही अहवाल आपल्याला पाठवलाच नाही, असं केंद्रीय कृषीमंत्र्यांनी लेखी उत्तरातून सांगितल्यानंतर गोंधळाला सुरुवात झाली. त्यानंतर हा गोंधळ संपला कृषीमंत्र्यांच्या तोंडी उत्तरामुळे. पाहूया, लेखी उत्तरापासून तोंडी उत्तरापर्यंतच्या गोंधळाचा राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट.
महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीचा अहवाल महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारला पाठवला की नाही, यावरून सुरु असलेला हा गोंधळ.
या गोंधळाची सुरुवात झाली ती केंद्रीय कृषीखात्याकडून आलेल्या या लेखी उत्तरानंतर.
महाराष्ट्र सरकारनं अतिवृष्टीचा प्रस्तावच पाठवलेला नसल्याचं केंद्र सरकारनं लेखी उत्तरातून सांगितलं.
केंद्र सरकारचं हे ब्लॅक अँड व्हाईटमधलं अधिकृत, ऑन रेकॉर्ड उत्तर समोर आल्यावर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली.
यानंतर सुरु झाली राजकीय धावाधाव.
राज्य सरकारनं मागच्याच आठवड्यात हा प्रस्ताव पाठवल्याचं सांगत कृषीमंत्री दत्ता भरणेंनी आपली बाजू स्पष्ट केली.