Shetkari KarjMafi : शेतकरी कर्जमाफीच्या अटी, मित्रांच्या कपाळावर आठी | Special Report
सरकारनं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केलीय.. मात्र या कर्जमाफीच्या धोरणावरून विरोधक जेवढे सरकारवर तुटून पडताहेत, त्यापेक्षा जास्त महायुतीच्या नेत्यांनीच हल्लाबोल सुरू केलाय... त्यात सर्वाधिक आघाडीवर आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे बच्चू कडू... दुसरीकडे कर्जमाफीच्या अटींमध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे असं स्वतः कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी देखील मान्य केलंय.. नेमकं कर्जमाफीच्या निकषावरून आणि धोरणावरून कोणतं राजकारण सुरू आहे.... पाहुयात
२ जून रोजी महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केलीय..
मात्र या कर्जमाफीवर महायुतीतूनच आक्षेप घेण्यास सुरूवात झालीय
शिवसेनेत प्रवेश करून, महायुती सरकारचा भाग झालेल्या बच्चू कडूंना ही कर्जमाफी अपुरी वाटतेय
कर्जमाफी संदर्भातल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पावसाळी अधिवेशनात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बच्चू कडूंनी दिलाय
आता तुम्ही म्हणाल की महायुतीचे आमदार होणारे बच्चू कडू विरोधकांची भाषा कशी काय बोलताहेत?
या प्रश्नावर बच्चू कडूंचं काय उत्तर आहे? तुम्हीच ऐका...
बच्चू कडूंनी कर्जमाफीबाबत मागण्यांची भली मोठी यादीच पत्रकार परिषदेत सादर केलीय
सर्व शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे कर्ज ३ वर्षात माफ करा
सर्व शेतकऱ्यांच्या सर्व कर्जमाफीसाठी ३ अर्थसंकल्पात प्रत्येकी २५ हजार कोटी द्या
वन टाईम सेटलमेंटचा आकडा २ लाखांपर्यंत न्या
५० हजारांच्या प्रोत्साहन निधीसाठी घातलेली २ वर्षांची अट काढा
प्रोत्साहनपर निधी ५० हजारांवरून १ लाखांवर न्या
विधवा, आत्महत्याग्रस्त महिला,दिव्यांगांना सरसकट कर्जमाफी द्या
मृत खातेदारांचीही सरसकट कर्जमाफी करा
१९९६ पासूनच्या चार कर्जमाफीला लाभ न मिळालेल्यांचीही कर्जमाफी करा
नियमित कर्जफेड करणाऱ्यांना दरवर्षी २५ ते ५० हजार रुपये द्या
२०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफी योजनेच्या लाभार्थींचे पैसे तात्काळ द्या
सर्व नगरसेवक, ग्रा.पं. सदस्य, हंगामी आणि कंत्राटी कर्मचारी यांचेही कर्ज माफ करा
All Shows































