Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

महाराष्ट्राचा ७५ टक्क्यांहून अधिक भाग दुष्काळाच्या संकटात आहे. सरकारनं दुष्काळाची घोषणाही केलीये. याचदरम्यान केंद्रीय पथकानंही दुष्काळग्रस्त भागाची नुकतीच पाहणी केली. या पथकानंही दुष्काळग्रस्त भागात खूप मोठं नुकसान झाल्याचं मान्यही केलंय... या पथकासमोर शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या आणि लवकरात लवकर मदत देण्याची मागणी केली... पाहूयात या सगळ्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट....राज्यातली ही भीषण दुष्काळाची परिस्थिती...
राज्यातल्या याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी
सध्या केंद्राचं एक पथक पाहणी करतंय...
आज धाराशिव, बीड, यवतमाळ, सोलापूरसह अनेक भागातया पथकानं पाहणी केली....
धाराशिवच्या ज्या करजखेडा भागात
मुख्यमंत्री फडणवीसांनी पाहणी केली होती
त्याच भागात आज केंद्रीय पथकाकडून पाहणी करण्यात आली
वाढ खुंटलेला ऊस, सुकलेलं सोयाबीन, गोठ्यातली जनावरं
ही सगळी परिस्थिती दाखवत
शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या
सोलापुरात केंद्रीय पथकानं
मंगळवेढा आणि सांगोल्यामध्ये दुष्काळ पाहणी दौरा केला
या भागात खूप मोठं नुकसान झाल्याचं पथकानं मान्य केलं
आणि अहवाल तातडीनं पाठवणार असल्याचं सांगितलं...
दुष्काळग्रस्त यवतमाळमध्येही
आज पाच सदस्यीय पथक पाहणीसाठी पोहोचलं...
या पथकानं नुकसानाची पाहणी करत शेतकऱ्यांसोबत संवाद साधला....
बीडमध्येही केंद्रीय पथकानं
दुष्काळपाहणी दौरा करत पाली इथल्या
स्वयंचलिक हवामान केंद्रीची आणि बिंदुसरा प्रकल्पाची पाहणी केली....
दरम्यान या पाहणी दौऱ्यानंतर
शेतकऱ्यांना तातडीनं भरघोस मदत देण्यात यावी अशी मागणी
आमदार अंबादास दानवेंनी केलीये...
ऑक्टोबर महिन्यातच दुष्काळाच्या तीव्र झळा राज्याला सोसाव्या लागतायत....
बदललेलं निसर्गचक्र... गायब झालेला पाऊस
आणि त्यामुळे हतबल झालेला बळीराजा...
हे सध्याचं वास्तव आहे...
केंद्राचं पथक पाहणी करून गेलंय...
दुष्काळामुळे मोठं नुकसान झाल्याचं या पथकानं मान्यही केलंय...
पण आता यासंदर्भातला अहवाल लवकरात लवकर सादर करून
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी हीच अपेक्षा...