Maharashtra Corona : सप्टेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट? निर्बंधातील शिथिलता महागात पडणार? ABP Majha
निलेश बुधावले, एबीपी माझा | 23 Aug 2021 11:58 PM (IST)
सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी वाढू लागलीय. येणाऱ्या सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवरही लोकांमध्ये उत्साह आहे. मात्र लवकरच तिसऱ्या लाटेमुळे या उत्साहावर विरजण पडण्याचीही शक्यता आहे आणि याचं कारण नीती आयोगाकडून सप्टेंबर महिन्यात वर्तवलेली तिसऱ्या लाटेची भीती. त्यामुळे तिसऱ्या लाटेची ही टांगती तलवार डोक्यावर असताना दिलेली शिथिलता महागात पडणार का? तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य प्रशासन आणि आरोग्ययंत्रणा सज्ज आहे का?