Maharashtra Collages Reopen : कॉलेज कॅम्पस गजबजणार; राज्यातील कॉलेज उद्यापासून 'अनलॉक' ABP Majha
abp majha web team
Updated at:
19 Oct 2021 11:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्यापासून राज्यभरातील कॉलेज सुरु होत आहेत. मात्र अनेक कॉलेजेसच्या एसओपी जाहीर होत नसल्यानं विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण होतं. मात्र आज औरंगाबाद आणि पुणे विद्यापीठानं संबंधित महाविद्यालयांच्या प्रशासनाला आदेश जारी केले आहेत. याशिवाय राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालये उद्यापासून सुरू होणार आहे.
20 ऑक्टोबरपासून कॉलेज सुरु करण्याबाबत राज्य सरकारनं हिरवा कंदील दिला आहे. मात्र पुणे, औरंगाबाद विद्यापीठ, आणि कृषी विद्यापीठाकडून कालपर्यंत त्यासंदर्भातले आदेश महाविद्यालयांना मिळाले नव्हते. मात्र आज आदेश जारी केल्यानं विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर झाला आहे...