Maharashtra CM : भावी मुख्यमंत्र्यांची यादी वाढली, ठाकरे काका, पुतण्याचा 'भावी मुख्यमंत्री' उल्लेख
abp majha web team
Updated at:
13 Jun 2023 11:59 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआदित्य ठाकरे आणि राज ठाकरे... महाराष्ट्राच्या राजकारणातली आणखी एक काकापुतण्याची जोडी. आदित्य असोत किंवा राज, या काकापुतण्याच्या जोडीत तसं फारसं काही सख्य किंवा जाहीर वितुष्टही नाही. दोघंही एकमेकांना तसं अनुल्लेखानंच टाळतात. पण दोघांचेही वाढदिवस हे लागोपाठच्या दिवशी येतात. त्यामुळंच का होईना, चाहत्यांनी मुंबईभर लावलेल्या होर्डिंग्समधून दोघांच्या नावाची एकत्र चर्चा होते. आणि यंदा तर आदित्य आणि राज यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांची भावी मुख्यमंत्री या आशयाची होर्डिंग्स लावण्यात आली होती. त्यामुळं चर्चेला खमंग फोडणी मिळाली होती.