Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

हवामान खात्याच्या अहवालानुसार १ जूनपासून आतापर्यंत सरासरीइतका पाऊस झालाय. काही ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त तर काठी ठिकाणी पावसानं सरासरी गाठलीये. यंदा मान्सूननं वर्दी देण्याआधी एल निनोच्या प्रभावामुळे कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र सध्याचे हे आकडे काहीसे सुखावणारे आहेत. या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यातही वाढ झालीये. पण असं असलं तरी हा पासून सर्वदूर सारख्याच प्रमाणात पडलेला नाही. राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात मात्र सरासरीइतका पाऊस झालेला नाही. पाहूयात या सगळ्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट....
एल निनोच्या प्रभावामुळे यंदा
पाऊस कमी पडणार असा अंदाज होता...
मात्र जूनमध्ये दडी मारलेल्या पावसानं
जुलैमध्ये आपला कोटा पूर्ण करत सरासरी गाठलीये...
राज्यात १ जून ते ८ ऑगस्ट
दरम्यान ६३७.१ मिमी पाऊस
नियमित सरासरीपेक्षा
जवळपास ६ टक्के
अधिक पाऊस
मुंबई उपनगर, पुणे, नाशिक,
सातारा, पालघर, जळगाव
आणि संभाजीनगरात
सरासरीपेक्षा जास्त पाऊस
मुंबई शहर, ठाणे, रायगड,
रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली,
धाराशिव, लातूर, नांदेड,
परभणी, यवतमाळ, वर्ध्यात
सरासरीइतका पाऊस
या समाधानकारक पावसामुळे
राज्यातील धरणांमधल्या जलसाठ्यातही
चांगली वाढ झालीये...
राज्यभरातील जवळपास तीन हजार लहानमोठ्या धरणांमध्ये
७१ टक्के पाणीसाठा असल्याची नोंद झालीये...
तर खरीप हंगामातील ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्यायत...