Mahaprabodhan Yatra Special Report : महाप्रबोधनाआधी महा'गटबाजी'? यात्रेआधीच ठाकरे गटात राडा
abp majha web team | 19 May 2023 11:31 PM (IST)
गेल्या काही दिवसांपासून सुषमा अंधारे आणि वाद हे जणू समीकरणच बनलंय... सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करुन सोडणाऱ्या सुषमा अंधारेंचं आता ठाकरे गटातच खटकायला लागलंय. बीडमध्ये होणाऱ्या महाप्रबोधन यात्रेपूर्वीच ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि आप्पासाहेब जाधव यांच्यात टोकाचा वाद झाला...आणि जाधव यांनी अंधारेंना कानशिलात लगावल्याचा दावा करत अनेक आरोपही केले...नेमका काय आहे हा वाद...आणि खरंच जाधवांनी अंधारेंना कानशिलात लगावली का ?