Lumpy Disease Special Report : लम्पीचा अर्थकारणावर थेट परिणाम, देशभरात प्रादुर्भाव Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोना विषाणूमुळं गेल्या दोन वर्षांमध्ये जगभरात काय घडलं ते आपण सगळ्यांनी जवळून पाहिलं. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लावावा लागला. सध्या तशाच लॉकडाऊनची टांगती तलवार राज्यावर आहे. पण हा लॉकडाऊन माणसांसाठी नसून प्राण्यांच्या बाबतीतला आहे. राज्यातील शेतकरी आणि पशुपालकांवर सध्या लम्पी रोगाच्या निमित्तानं एक गंभीर संकट घोंगावतंय. सुरुवातीला उत्तर भारतात या आजाराचा शिरकाव झाला. आता हा आजार राज्यातल्या 310 गावांपर्यंत पोहोचला आहे. ((राजस्थानमध्ये तर हजारो जनावरं या आजारामुळे दगावलीयेत. पण याच लम्पी आजाराचा शिरकाव आता राज्यात देखील झाल्यामुळे सगळ्यांची चिंता वाढलीये. राज्यातील 310 गावांमध्ये हा आजार पोहोचलाय. हा आजार आणखी पसरु नये म्हणून जनावरांसाठी एकप्रकारे लॉकडाऊन लागू करावा का याचाही विचार सुरु आहे..)) या परिस्थितीत पशुपालक शेतकऱ्यांनी काय करावं, हा आजार आटोक्यात कसा आणावा, लम्पीचा संसर्ग होऊ नये म्हणून काय काळजी घेता येईल आणि झाल्यावर काय करणं अपेक्षित आहे आदी शेतकऱ्यांना पडणाऱ्या प्रश्नांबद्दल आपण बोलणार आहोत. त्यांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरंही आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत कोकण विभागाचे पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. प्रशांत कांबळे आणि मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे विभागप्रमुख डॉ राजीव गायकवाड आहेत.