निवडणूक निकाल २०२६
(Source: ECI/ABP News)
Loksabha Drama : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंधळाचा कळस Special Report

पण, हे सगळं काही आज सुरु झालेलं नाहीय.. खरंतर, सध्या संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे.. तिथं अर्थसंकल्पावरच चर्चा अपेक्षित आहे.. पण, गेल्या चार दिवसांपासून इथं चर्चा फक्त एका पुस्तकाचीच आहे.. नुसती चर्चाच नाही तर याच एक पुस्तकामुळे गेल्या चार दिवसांपासून संसदेचं कामकाजही नावापुरतंच झालंय. इतके दिवस लोकसभेत हा सगळा गोंधळ सुरु होता.. आज तोच राज्यसभेतही पोहोचला... राज्यसभेत नेमकं काय काय घडलं पाहुयात..
गेल्या तीन दिवसांपासून लोकसभेत सुरु असलेला..
गोंधळ...
आज राज्यसभेतही पोहोचला..
कारण, तेच होतं..
तेच पुस्तक.. तेच आर्टिकल..
आणि तोच मुद्दा..
गेल्या चार दिवसांपासून राहुल गांधी
माजी लष्करप्रमुख एमएम नरवणेंनी लिहिलेल्या Four Stars of Destiny..
पुस्तकाचा दाखला देत, सरकारवर टीका करतायेत..
मात्र, त्यांना असं बोलण्यास खुद्द लोकसभा अध्यक्षांनीच मनाई केलीय..
मग काय..
सत्ताधारी विरुद्ध विरोधक..
असाच गोंधळ गेल्या चार दिवसांपासून आहे..
याच गोंधळाचा उल्लेख करत..
काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेेते मल्लिकार्जुन खरगेंनी
त्याच पुस्तकांचा आधार घेत भाषणाला सुरुवात केली..
अपेक्षेनुसार दोन्ही बाकांवरुन गोंधळ सुरु झाला..