Mumbai Local restart! येत्या सोमवारपासून सर्वांसाठी लोकल धावणार,रेल्वे बोर्डाकडूनही प्रवासाला मंजुरी
एबीपी माझा वेब टीम | 29 Jan 2021 10:57 PM (IST)
मुंबई : अखेर मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 1 फेब्रुवारीपासून मुंबई लोकल सर्वांसाठी खुली करण्यात येणार असल्याचं, राज्य सरकारनं सांगितलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसोबत इतर काही लोकांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली होती. पण सर्वसामान्यांना मात्र परवानगी देण्यात आलेली नव्हती. आता मात्र गर्दी होणार नाही अशा वेळा आखून मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी सर्वसामान्यांना देण्यात आली आहे.