अतिदुर्गम भागातील शिक्षिकांची शाळेत जाण्यासाठी जीवघेणी कसरत, रायगडच्या गौळावाडीतील शिक्षिकांची व्यथा
निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई | 23 Jun 2021 11:15 PM (IST)

जिल्हा परिषदेतील महिला शिक्षिकेना दुर्गम किंवा अतिदुर्गम भागात नियुक्ती देण्यात येऊ नये असा शासनाचा 2017 सालचा जीआर आहे. मात्र याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे राज्यातील 18 हजार महिला अतिदुर्गम भागात काम करत आहेत. याचं उदाहरण म्हणजे प्रिया असोलकर या पनवेल येथे राहणाऱ्या महिला शिक्षिका. त्या दररोज पनवेल ते पेन तालुक्यातील कोंडी गावापर्यत एसटीने जातात आणि तिथून पुढे जंगलात 1 तास चालत जवळावाडी या गावात शाळेवर शिकवायला जातात. दररोज 80 किलोमीटरचा प्रवास प्रिया असोलकर आणि त्यांच्या सहकारी महिला शिक्षिका करतात.