Latur Grocery Price Special Report : किराणा माल महागला, सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
abp majha web team | 03 Aug 2023 09:34 PM (IST)
Latur Grocery Price Special Report : किराणा माल महागला, सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
हल्ली खरेदीसाठी बाजारात जायचं म्हटलं की, खिशाची आणि महिन्याच्या बजेटची चाचपणी करून घ्यावी लागतेय. कारणय महागाई. गहू घ्या, ज्वारी घ्या... तांदूळ घ्या किंवा कोणतीही भाजी घ्या... तुमची महागाईची गाठ पडणार म्हणजे पडणारच. त्यामुळे सर्वसामान्यांच्या बजेटला मोठी घरंगळ लागलीय. पण या महागाईची कारणं काय आहेत? आणि महागाई नेमकी कमी कधी होणार? की महागाईचा हा भडका असाच खिसा जाळत राहणार? या प्रश्नांचा धांडोळा घेणारा, विशेष रिपोर्ट पाहूयात.