Lakhimpur Kheri : लखीमपूरमधील हिंसाचारावरुन राजकीय वादंग Special Report
एबीपी माझा वेब टीम | 04 Oct 2021 11:22 PM (IST)

नवी दिल्ली : गेल्या दहा महिन्यांपेक्षा अधिक काळ सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनानं काल एक गंभीर वळण घेतलं आहे. उत्तर प्रदेशातल्या लखीमपूरमध्ये केंद्रीय गृह राज्य मंत्र्यांच्या मुलानं शेतकरी आंदोलकांवर गाडी घातल्याचा आरोप होत आहे. त्यानंतर झालेल्या हिंसाचारात आत्तापर्यंत 8 जणांचा बळी गेला आहे.
परवाच देशानं गांधीजयंती साजरी केली आणि अगदी दुसऱ्या दिवशीच उत्तर प्रदेशातल्या लखीमपूरमध्ये हे घडलं. केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या मुलानं शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याचा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांनीही नंतर जाळपोळ केल्याचा दुसऱ्या बाजूचा आरोप आहे. हिंसाचाराच्या या तांडवात आत्तापर्यंत 8 जणांचा बळी गेलाय.