✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Lakhimpur Kheri : आणखी कोणता पुरावा हवा? शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणारा लखीमपुरातील 'तो' व्हिडीओ समोर

एबीपी माझा वेब टीम   |  05 Oct 2021 11:23 PM (IST)

लखनऊ : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने गाडीने चिरडले होते. यामध्ये आतापर्यंत नऊ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये एक SUV गाडी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या गर्दीत घुसते आणि त्यांना तशीच चिरडत पुढे निघून जाते असं दिसतंय. हा व्हिडीओ लखीमपूर खेरी या ठिकाणचा असल्याचं सांगण्यात येतंय. 


जवळपास 25 सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आंदोलक शेतकरी सरकार विरोधी घोषणाबाजी करत रस्त्यावरून चालले आहेत आणि मागून अचानक एक SUV कार येते आणि त्यांना चिरडून तशीच पुढे निघून जाते.  पण हा व्हिडीओ लखीमपूरमधील आहे की नाही याची सत्यता उत्तर प्रदेश पोलिसांनी अद्याप तपासली नाही. 


ही SUV केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या ताफ्यातील होती. या SUV मध्ये मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा हाच बसला होता असं प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी सांगितलंय. 


केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ते लखीमपूरचे भाजपचे खासदारही आहेत. "सुधर जाओ वरना दो मिनीट लगेंगे हमे..." अशा पद्धतीची भाषा त्यांनी शेतकरी आंदोलकांबाबत वापरली होती. रविवारी याच केंद्रीय मंत्र्याचा एक कार्यक्रम लखीमपूर होणार होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी तिथं निदर्शनं करायचा निर्णय घेतला.  

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Lakhimpur Kheri : आणखी कोणता पुरावा हवा? शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणारा लखीमपुरातील 'तो' व्हिडीओ समोर

TRENDING VIDEOS

Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण9 Hour ago

Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले9 Hour ago

Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE10 Hour ago

Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत14 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.