Lady Shri Ram College Closed : लेडी श्रीराम कॉलेजमध्ये सुरक्षेचा गंभीर प्रश्न | Special Report ABP Majha

दिल्लीतील ७० वर्ष जुन्या लेडी श्रीराम कॉलेजमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कॉलेजजवळच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी कॉलेजनं एक मोठा निर्णय घेतलाय. पाहूयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट...
दिल्लीतील हे प्रतिष्ठित लेडी श्रीराम कॉलेज...
खास मुलींसाठी सुरू असलेलं हे कॉलेज
७० वर्षांनी एका घटनेमुळे चक्क बंद करण्यात आलंय...
मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचं
कॉलेज प्रशासनाचं म्हणणं आहे...
त्यात कॉलेजशेजारीच झालेल्या बलात्काराच्या घटनेमुळे
इथे शिकणाऱ्या मुलींमध्ये सध्या दहशतीचं वातावरण आहे...
लेडी श्रीराम कॉलेज सारख्या मुलींसाठीच्या शिक्षणसंस्थेतील
सुरक्षेचा हा गंभीर मुद्दा केवळ कॉलेज कॅम्पसच्या चार भिंतींपुरता मर्यादित नाहीये....
तर या कॉलेजच्या आसपास असणारं मेट्रो स्टेशन...
पार्क, येण्या-जाण्याचे रस्ते याठिकाणीही सुरक्षेचा प्रश्न आहे...
त्यात नुकतीच घडलेली अत्याचाराची घटना आणि त्याआधी
कॉलेजच्या मागच्या गेटवर झालेला एन्काऊंटर
या सगळ्यामुळे विद्यार्थिनी, शिक्षक आणि पालकांमधून चिंता व्यक्त होतेय...
त्यामुळे ऑनलाईन वर्ग हा तात्पुरता उपाय झाला
मात्र दिल्लीतल्या मुलींना कॉलेजसारख्या ठिकाणी
भयमुक्त आणि सुरक्षित वातावरण कधी मिळणार?