Kumbh mela चं कारण, मतभेदाचं तोरण; फडणवीसांच्या बैठकांना शिंदेंची दांडी यात्रा Special Report

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठक आयोजित करतायत आणि उपमुख्यमंत्री त्याकडे पाठ फिरवत आहेत असं चित्र आता नेहमीच दिसू लागल. याचं ताज उदाहरण आहे आजच्या कुंभमेळ्याच्या बैठकीच. दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी कुंभमेळ्याबाबत बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला दांडी मारत शिंदे मलंगगडाच्या कार्यक्रमाला गेले. त्यानंतर त्यांनी... बोलावलेल्या बैठकीला दांडी मारून गिरीश महाजनांनी त्याची परतफेड केल्याची चर्चा आहे. मात्र नाशिक आणि रायगडच पालकमंत्री पद स्थगित करावं लागण्या इतपत शिंदेंची तीव्र नाराजी. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकांकडे वारंवार फिरवलेली पाठ. महानगरपालिकांच्या आढावा बैठकीकडे नगर विकास खात असूनही पाठ फिरवली जाण. प्रत्येक विभागाच्या 100 दिवसांच्या आढावा बैठकीकडेही पाठ. शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू झालेल्या योजनांना नव्या सरकारमध्ये लागणारे ब्रेक. असं करत करत नाराजीचा हा सिलसिला वाढतच. चालल्याच चित्र आहे. पण सत्ताधारी नेते मात्र इतके सकारात्मक आहेत की त्यांना असली काही नकारात्मकता बिलकुल दिसत नाही. ज्यावेळी मुंबईमध्ये बैठक सुरू होती त्यावेळी ते नाशिक दौऱ्यावर होते. प्रत्येक वेळी एकनाथ शिंदे साहेब त्या बैठकीला उपस्थित नव्हते. ही जरी सूत्रांकडन माहिती मिळत असेल तर त्यांच्या मधलं समन्वय जो आहे तो अतिशय चांगला आहे देवेंद्रजीं मधला आणि त्यांच्या मधला. याच्यावर आमची विरोधक जे सारखी टीका करतात त्यांनी माहिती घेतली पाहिजे की त्या दौऱ्यावरती कुठे आहेत. का मुख्यमंत्री महोदयां बरोबर. त्यामुळे त्याला बातमी बनवणं एवढे मोठी घटना ती नाही आहे. प्रत्येक गोष्टीची बातमी करू नका सगळं चांगलं चाललय नीट आहे. मुख्यमंत्री महोदयांची वाररूम म्हणजे सुरू आहे. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यापासून सुरू झालेली नाराजीची गोष्ट आता कुंभमेळ्याच्या बैठकीपर्यंत येऊन ठेपली आहे. वागण्यात दुरावा आणि बोलण्यात गोडवा अशा अवस्थेत सध्या दोन नेत्यांमधील संबंध येऊन ठेपलेत. आता वागण्यातला गोडवा वाढत जाणार की बोलण्यातला गोडवाही कमी होत जाणार हे हळूहळू स्पष्ट होईलच.