Kolhapur Ambabai Temple Special Report : अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाला वाळवी : ABP Majha
abp majha web team | 23 Jan 2023 08:01 AM (IST)

कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेली करवीर निवासिनी आई अंबाबाई. आई अंबाबाईच्या मंदिर परिसरात येताच मन प्रसन्न होतं. पण याच मंदिराचा गरुड मंडप धोकादायक असल्याचं समोर आलंय. गरुड मंडपाच्या आठ खांबांना वाळवी लागलीये.