Kirit Somaiya controversy : 'त्या' फोटोप्रकरणी किरीट सोमय्यांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान Special Report
abp majha web team | 27 Jan 2022 07:52 PM (IST)
यानंतरची बातमी किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या आव्हानाची.. भाजप नेते किरीट सोमय्यांचा मंत्रालयातला फोटोवरुन वाद वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात सोमय्यांना नोटीस बजावण्यात आलीय. त्यामुळे आता किरीट सोमय्या यांनीही पोलिसांत तक्रार दाखल केलीय. प्रताप सरनाईक यांच्याशी संबंधित फाईल तपासण्यासाठी मंत्रालयात गेलो होतो असा दावा सोमय्यांनी केलाय. यावेळी पत्रकार परिषद घेत सोमय्यांनी आरोपांच्या फटाक्यांची माळच लावली. बघुयात या संदर्भातील रिपोर्ट