✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Kerala Politics : सोडलं तर पळतंय..म्हणून केरळचं अडतंय, कोण होणार केरळचे मुख्यमंत्री ? Special Report

abp majha web team  |  10 May 2026 11:36 PM (IST)
ABP News

Kerala Politics : सोडलं तर पळतंय..म्हणून केरळचं अडतंय, कोण होणार केरळचे मुख्यमंत्री ? Special Report


Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)


पश्चिम बंगाल मध्ये शुभेंदु अधिकारी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तामिळनाडू मध्ये जोसेफ विजय यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर लवकरच हेमंत बिस्व शर्मा देखील आसामचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. मात्र केरळच्या मुख्यमंत्री पदाचा पेच काही राहुल गांधींकडून सुटता सुटत नाहीये कारण धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी त्यांची अवस्था झालीये. व्ही डी सतीश अन के सी वेणुगोपाल की रमेश चेन्निथला केरळचे मुख्यमंत्री म्हणून कोणाचा राज्याभिषेक होणार या प्रश्नाच्या उत्तराची केरळच्या जनतेला प्रतीक्षा आहे. आणि ज्यांना या प्रश्नाचे उत्तर द्यायचं आहे ते राहुल गांधी देखील बुचकाळ्यात पडलेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. 140 पैकी 102 जागा जिंकत जवळपास दशक भरानंतर काँग्रेस प्रणीत यूडीएफ न केरळची सत्ता मिळवली आहे. मात्र मुख्यमंत्री पदासाठी तीन प्रबळ दावेदार असल्यानं मोठा पेच निर्माण झालाय. व्ही डी सतीश अन हे पाराबुर मतदारसंघातून पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आलेत. केरळ काँग्रेसवर चांगली पकड असलेला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. तीन माजी प्रदेशाध्यक्षांनी मुख्यमंत्री पदासाठी सतीश अन यांचा नाव पुढे केलंय. यूडीएफ मधील मित्र पक्षांचा सतीश अन यांच्या नावाला कौल मिळतोय. निकाला आधीच्या सर्वेक्षणात सतीश अन यांना मावळते मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि के सी वेणुगोपाल यांच्यापेक्षा जास्त मत मिळाली. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत व्ही डी सतीश अन यांची सर्वात मोठी स्पर्धा आहे ती के सी वेणुगोपाल यांच्याशी. ए आय सी सी चे सरचिटणीस आणि केरळ मधील अल्पुझा इथून खासदार आहेत. राहुल गांधींचे निकटवर्ती असून धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग असतो. जवळपास 75% आमदारांचा वेणुगोपाल यांना पाठिंबा असल्याचा दावा केला जातोय. मुख्यमंत्री व्हायचं असेल तर लोकसभेची जागा रिक्त करून विधानसभा लढवावी लागेल. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी म्हणून रमेश चेन्निथला आपल्या सगळ्यांना परिचित आहेतच. मात्र केरळच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत ते देखील आहेत. अल्पुझा मधील हरिप्रसाद मतदार मतदारसंघातून ते आमदार आहेत. त्यांनी सहा वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. ते एन एस यू आय विद्यार्थी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ही राहिले आहेत. 69 वर्षांचे चेन्निथला हे मुख्यमंत्री पदाच्या दावेदारांमध्ये सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. रमेश चेन्निथला हे सतीश अन यांच्या आधी केरळ विधानसभेत विरोधी पक्ष नेते होते. 2021 मध्ये सतीश अन यांना विरोधी पक्ष नेते केल्यामुळे चेन्निथला नाराज झाले होते. केरळचे मुख्यमंत्री म्हणून या तिघांपैकी एकाचं नाव जाहीर करावच लागणार आहे. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की राहुल गांधींची अडचण नेमकी काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी थोडं आसामच्या भूतकाळात जावं लागेल. 2011 मध्ये काँग्रेसने आसाम मध्ये सत्ता स्थापनेची हाय ट्रिक मारली. मुख्यमंत्री तरुण गोगोई यांना त्यांचा मुलगा गौरव याला उत्तराधिकारी म्हणून नेमायचं होतं मात्र तेव्हा हेमंता बिस्व शर्मा आसाम सरकार मधील सर्वात शक्तिशाली मंत्री म्हणून ओळखले जायचे. 54 आमदारांच्या पाठिंब्यासह त्यांनी राहुल गांधींकडे मुख्यमंत्री पदाची मागणी केली. मात्र राहुल गांधींनी त्यांची ही मागणी फेटाळून लावली. झालं हेमंताने काँग्रेस सोडली आणि भाजपात गेले. आता आसाम मध्ये सत्ताधारी पक्ष भाजप आहे आणि काँग्रेसची संख्याबळ 20 हून खाली गेली आहे. हेमंता बिस्व शर्मा प्रमाणे व्ही डी सतीश अन देखील मुख्यमंत्री पद न मिळाल्यास काँग्रेसला राम राम ठोकू शकतात अशी शक्यता वर्तवली जातीये. आसाम मध्ये तोंड पोळल्यामुळे आता राहुल गांधी केरळ मध्येही ताक फुंकून पितायत. ही फुंकर कोणाला केरळचा मुख्यमंत्री करणार आणि कोणाची नाराजी ओढवून घेणार हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. 

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Kerala Politics : सोडलं तर पळतंय..म्हणून केरळचं अडतंय, कोण होणार केरळचे मुख्यमंत्री ? Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.