Periods Leave Policy कोणत्या राज्यात मिळते मासिक पाळी रजा? Special Reports

Periods Leave Policy कोणत्या राज्यात मिळते मासिक पाळी रजा? Special Reports
कर्नाटक सरकारनं नुकताच एक ऐतिहासिक निर्णय घेतला. सरकारी तसंच खाजगी कार्यालयातील महिलांसाठी दर महिन्याला भर पगारी मासिक पाळी रजा मिळणार आहे. पण भारतात अगदी मोजक्या राज्यांमध्ये महिलांसाठी अशा रजेची तरतूद आहे. ती राज्य नेमकं कोणती आहेत? खरंच नोकरदार महिलांना मासिक पाळी रजेची गरज आहे का?
स्त्री ही कणखर असते... घर, कुटुंब, ऑफीस आणि अशा कित्येक जबाबदाऱ्या ती रोजच समर्थपणे पार पाडत असते.... तिची सहनशीलता, जबाबदाऱ्या झेलण्याची ताकद आणि परिस्थितीला सावरुन पुढे जाण्याची वृत्ती याला कशाचीच तोड नाही... पण प्रत्येक महिन्यात एक असा काळ येतो ज्यावेळी तिला, तिच्या शरीराला खरंच गरज असते ती थोड्याशा विश्रांतीची.... तो म्हणजे मासिक पाळीचा काळ...
मासिक पाळीदरम्यान अनेक महिलांना तीव्र वेदना होतात... काहींना तर रोजची कामं करणंही कठीण जातं... इतकंच नाही तर काहींना वेदनाशामक औषधं घ्यावी लागतात... पण आपल्या समाजात ही गोष्ट, स्त्रियांना होणारा हा त्रास बऱ्याचदा दुर्लक्षित केला जातो ऑफिसमध्ये काम करणाऱ्या स्त्रियांना अशा दिवसांमध्ये कामावर लक्ष केंद्रित करणं बऱ्याचदा कठीण जातं... म्हणूनच आता अनेक राज्यांमध्ये मासिक पाळी रजेसंदर्भात सकारात्मक पावलं उचलली जातायत... कर्नाटक राज्यामध्ये नुकतीच नोकरदार महिलांसाठी पीरीयड लीव्ह मंजूर करण्यात आली आहे....