Sangli Jat Water Special Report : कर्नाटक सरकारने पुन्हा महाराष्ट्राला डिवचलं! ABP Majha
abp majha web team | 02 Dec 2022 10:01 PM (IST)

जत तालुक्याच्या सीमावर्ती भागातील पाणी प्रश्न सरकारच्या अजेंड्यावर आलाय. एकीकडे महाराष्ट्र सरकारने म्हैसाळ पाणी योजनेतून जतकरांची तहान भागवण्याच्या हालचाली सुरु केल्यात. तर दुसरीकडे तिकोंडी तलावात पाणी सोडण्याचा खोडसाळपणा कर्नाटक सरकारने केलाय. कर्नाटक सरकारने साधलेलं हे टायमिंग महाराष्ट्र सरकारची मात्र डोकेदुखी वाढवणारं ठरतंय.