Karnataka चे मुख्यमंत्री माफी मागणार? भाजप नेत्यांकडून साधा निषेधही का नाही?
abp majha web team | 19 Dec 2021 10:36 PM (IST)

मुंबई : बंगळुरू (Bangalore ) येथे छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्याची विटंबना करणारी घटना नुकतीच घडली आहे. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. दरम्यान, या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी सात जणांना अटक केली असून या संशयीत आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.