Cyber Fraud Alert: व्हॉट्सअॅपची एक चूक, अन् जळगावमधील व्यक्तीला 4.65 लाखांचा गंडा! Special Report
abp majha web team | 13 Oct 2025 10:18 PM (IST)
जळगावमधील रहिवासी निलेश सराफ यांना WhatsApp वरील एका छोट्या चुकीमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. वॉशिंग मशीन दुरुस्तीसाठी गुगलवरून कस्टमर केअर नंबर शोधणं त्यांना चांगलंच महागात पडलं. 'माझं वॉशिंग मशीन जे बंद पडलं होतं, म्हणून मी ती तक्रार केली की वॉशिंग मशीन रिपेअर करायचं मला,' असं निलेश सराफ यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांना एका अनोळखी नंबरवरून कॉल आला आणि त्यांच्या व्हॉट्सअॅपवर एक APK फाईल पाठवण्यात आली. मोबाईलमधील 'ऑटो डाउनलोड' सेटिंग सुरू असल्यामुळे ही फाईल आपोआप डाउनलोड झाली आणि हॅकर्सनी त्यांच्या खात्यातून सुमारे ४ लाख ६५ हजार रुपये काढून घेतले. सायबर तज्ज्ञांच्या मते, केवळ ऑटो डाउनलोडमुळे पैसे जात नाहीत, पण यामुळे मालवेअर किंवा व्हायरस फोनमध्ये येऊ शकतो, ज्यामुळे हॅकर्सना फोनचा ताबा मिळवता येतो. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.