J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report

एकीकडे दिल्लीच्या रस्त्यांवर असं घमासान सुरू असताना आज पहिल्यांदाच सरकार आणि कॉक्रोच जनता पार्टीचे प्रतिनिधी आमनेसामने आले... आंदोलकांच्या वतीनं केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय... आता यावर सरकार काय निर्णय घेणार? आंदोलकांच्या किती मागण्या पूर्ण होणार? याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय... बघुयात दिल्लीतल्या भेटीगाठी, खलबतं आणि या पार्श्वभूमीवर संसदेत उमटलेल्या पडसादावर आधारित हा स्पेशल रिपोर्ट...
ही पहिलीच भेट...
आणि पहिलाच संवाद...
'नीट' पेपरफुटीविरोधात आंदोलन सुरू झाल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकारची प्रथमच बैठक झाली...
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सीजेपीनं मोर्चाची हाक दिली होती...
या आंदोलनानं ऊग्र रूप धारण केलं आणि दिल्लीच्या रस्त्यांवर सकाळपासून जोरदार राडा झाला...
त्यानंतर सरकारच्या वतीनं केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी नड्डा यांच्यावर आंदोलकांना भेटण्याची जबाबदारी देण्यात आली...
सीजेपीचे समन्वयक सौरव दास आणि प्रवक्ता आषुतोष रांका यांनी दुपारी नड्डा यांची संसदभवनात भेट घेतली...
दोन तास वाट पाहिल्यानंतर नड्डा यांनी केवळ १० मिनिटं भेट दिल्याचा दावा दास यांनी ट्विटद्वारे केला...
या भेटीबाबत नड्डा यांनीही सोशल मीडियातून माहिती दिली...