Thane Corona : ठाणे पालिका कोरोनाची आकडेवारी दडवतेय? मृतांच्या आकड्यापेक्षा मृतदेहांची संख्या अधिक
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई | 15 Apr 2021 11:46 PM (IST)
ठाणे : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. अशातच राज्यात आज रात्री 8 वाजल्यापासून पुढच्या 15 दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यातील अनेक मोठ्या शहरांत आणि जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. अशातच ठाण्यातही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. परंतु, ठाणे महानगरपालिका कोरोना बाधित रुग्णांचे आकडे लपवत आहे की, काय असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय.