ST चं खाजगीकरण करावं का? तोट्याच्या गर्तेतून लालपरीला बाहेर कसं काढायचं? लालपरीला कसं तारायचं?
राहुल कुलकर्णी, एबीपी माझा Updated at: 08 Nov 2021 11:26 PM (IST)
एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेमध्ये समावून घ्यावं ही जुनीच मागणी आहे. परंतु या मागणीला आज जे बळ मिळताना दिसत आहे त्याची कारणं गेल्या पाच वर्षात दडली आहेत. ती कारणे काय आहेत हे समजून घेऊ, त्यासोबत एसटी महामंडळासमोर खाजगीकरण की सरकारी व्यवस्थापन कोणता योग्य पर्याय आहे हे ही पाहुयात...