Shivsena ED Special Report : सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर ठाकरेंची शिवसेना?
abp majha web team | 28 Jun 2023 12:02 AM (IST)
ठाकरे गटाच्या अडचणी काही कमी होत नाहीयेत....आधी शिंदेंनी बंड केला..शिवसेनेत उभी फुट पडली... उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला... पुढे मविआचं सरकार पडलं आणि शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं... हे सगळं घडत असतानाच भ्रष्टाचाराचे आरोप प्रत्यारोपही सुरु झाले..आणि हेच आरोप पुढे ईडी चौकशीपर्यंत येवून पोहोचले.. मविआतील अनेक नेत्यांच्या मागे ईडीची पिडा लागली...मात्र टार्गेटवर राहिले ते ठाकरे गटाचे नेते... कधी ठाकरे गटाची तोफ असलेल्या संजय राऊतांना अटक झाली... तर कधी अनिल परब चौकशीच्या फेऱ्यात अडकले.. आणि आता वेळ आलीये ती सूरज चव्हाण यांची.. त्यामुळे ईडी फक्त ठाकरे गटाच्यांच नेत्यांना टार्गेट करतेय का? असा प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित होतोय.