India Inflation Special Report: महागाईचा भडका, सर्वसामान्यांना झळ ABP Majha
abp majha web team
Updated at:
13 May 2022 10:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमार्चमध्ये किरकोळ महागाईचा दर ६.१५ टक्के इतका होता. तो महिनाभरात दीड टक्क्यांपेक्षा अधिक वाढला. वर्षभराचा विचार करता खाद्य महागाईचा हाच दर गेल्या एप्रिलमध्ये केवळ १.९६ टक्के इतका होता. गेले चार महिने महागाईची ही विक्रमी वाढ रिझर्व्ह बँकेनं घालून दिलेल्या कमाल मर्यादेपेक्षाही अधिक आहे. आरबीआयनं ६ टक्के मर्यादा निश्चित केली आहे. खाद्यतेलाच्या दरात झालेली भरमसाट वाढ, रुपयाची घसरण आणि इंधनाच्या किमती वाढल्यानं महागाईचा आगडोंब उसळला आहे.