Indian Navy Day 2023 Special Report : नौदलाचा इतिहास अमिताभ मांडणार, जुन्या आठवणींना उजाळा मिळणार
abp majha web team | 04 Dec 2023 11:59 AM (IST)
Indian Navy Day 2023 Special Report : नौदलाचा इतिहास अमिताभ मांडणार, जुन्या आठवणींना उजाळा मिळणार
राजधानी नवी दिल्लीत होणारा नौदल दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा शिवराज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षानिमित्त सिंधुदुर्गात होत आहे. यामध्ये नौदलाकडून मोहिमांवर आधारित विविध प्रात्यक्षिके तारकर्लीच्या समुद्रात सादर होणार आहेत. त्यामध्ये विमानवाहू युद्धनौकांपासून ते अन्य युद्धनौका, लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, कमांडो कारवाया आदींचा समावेश आहे. सायंकाळी ५.१५ वाजता सुरू होणाऱ्या प्रात्यक्षिकांआधी अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील ध्वनीचित्रफित महत्त्वाची ठरणार आहे.