IND VS AUS | भारतासमोर किमान 370 धावांचं लक्ष्य, दुसऱ्या दिवसअखेर भारत 2 बाद 62,पावसामुळे थांबला खेळ
एबीपी माझा वेब टीम | 16 Jan 2021 10:52 PM (IST)
IND Vs AUS 4th Test यजमान ऑस्ट्रेलियाला 369 धावांवर रोखल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शुभमन गिलला कमिन्सनं स्वस्तात माघारी पाठवलं. तर दुसरीकडे चांगला खेळ करत असतानाच नॅथन लायनच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका मारुन रोहित शर्मा झेलबाद झाला.
रोहित शर्मानं 6 चौकारांच्या मदतीन 44 धावा केल्या. रोहित आणि शुभमन गिल बाद झाल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी संयमी फलंदाजी करत भारतीय संघाचा डाव सावरला. चहापनापर्यंत भारतीय संघानं दोन गड्यांच्या मोबदतल्यात 62 धावा केल्या. ज्यानंतर पावसामुळं दुसऱ्या दिवसातील खेळात व्यत्यय येण्यास सुरुवात झाली.