India Post unveils DIGIPIN : पिनकोडला 'टाटा', डिजिपिनला 'वेलकम', डिजिपिन कसा मिळवायचा? Special Report
India Post unveils DIGIPIN : पिनकोडला 'टाटा', डिजिपिनला 'वेलकम', डिजिपिन कसा मिळवायचा? Special Report
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
बातमी मोबाईलच्या जमान्यामध्ये एकमेकांना पत्र पाठवणं हे जणू काळाच्या पडद्या अडच गेले कारण एका क्लिकवर आपला संदेश आपण काही क्षणात समोरच्यापर्यंत पोहोचवू शकतो. पण आपल्यापैकी अनेकांनी कधीतरी पत्र लिहिलच असेल. त्या पत्रावर पत्त्यासोबत टाकलेला पिन कोड आता कालबाह्य होणार आहे. ते कसं जाणून घेऊया या रिपोर्टमधून. पिन कोड. नुसता हा शब्द जरी कानावर पडला तरी पत्र डोळ्यासमोर येत नाही का? पत्र असो वा? एखाद्याला पार्सल पाठवण असो, अगदी ऑनलाईन शॉपिंग साठीही जो महत्त्वाचा असतो तो म्हणजे आपला पिन कोड, पण आता हा सहा अंकांचा पिन कोड लक्षात ठेवण्याची गरज नाहीय, होय, कारण आता तुमच्या पिन कोडची जागा डीजी पिन घेणार आहे. भारतीय पोस्ट विभागाने डिजिटल क्रांती साधत आता तुमच्या पत्यापर्यंत सहज पोहोचण्यासाठी नवा पर्याय शोधलाय, पिन कोडमुळे तुमच्या घरापर्यंतचा पत्ता शोधणं कठीण आहे. पण आता. सांगू शकतो. आता तुम्ही म्हणाल पिन कोड आणि डीजी पिन यात फरक काय आहे तर तेही जाणून घेऊयात. पिन कोड हा सहा अंकी नंबर आहे जो मोठ्या परिसराची, शहराची, जिल्ह्याची किंवा गावाची ओळख सांगतो. तर डीजी पिन हा 10 अंकी युनिकोड आहे जो तुमच्या घराच्या नेमक्या जागेची अचूक माहिती देतो. उदाहरण द्यायचं झालं तर पिन कोडमुळे कुरियर तुमच्या परिसरात पोहोचेल. मात्र डीजीपीन मुळे कुरियर थेट तुमच्या दारापर्यंत पोहोचेल.