India Pakistan Special Report : उद्या रविवार, होणार क्रिकेटवॉर! संध्याकाळी दुबईत रंगणार महामुकाबला
abp majha web team | 27 Aug 2022 09:19 PM (IST)

युएईतल्या ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकात उद्या टीम इंडियाचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होणार आहे. बाबर आझमच्या पाकिस्तानी फौजेनं टीम इंडियाचं विश्वचषकातलं निर्विवाद वर्चस्व मोडून काढलं, त्याला जेमतेम दहा महिने उलटलेयत. योगायोगाची गोष्ट म्हणजे बाबर आझमच्या फौजेनं तो ऐतिहासिक विजय मिळवला, त्याच मैदानात उद्या भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येत आहेत. पाहूयात या सामन्यावर एबीपी माझाचा खास रिपोर्ट.