India Pak Relation Special Report : ७५ वर्षांनंतर पाकिस्तानला सुचलं शहाणपण, भारत-पाक मैत्रीसाठी शरीफांचे सूर
abp majha web team | 17 Jan 2023 10:58 PM (IST)
पाकिस्तान उशिरा सुचलेल्या शहाणपणाची...पाकिस्तानात ऐतिहासिक गरिबी, महागाई, बेरोजगारी अशा सगळ्या पातळ्यावर आर्थिक संकट आलेलं असताना पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची एक मुलाखत समोर आलीए.. आणि त्यांनी या मुलाखतीत गेल्या ७५ वर्षांमधल्या चुकांचा पाढाच वाचलाय. पाकिस्तानाची सर्वात मोठी चूक शरिफ यांनी मान्य केली.. भारताशी पंगा घेण्यासाठी पाकिस्ताननं अण्विक शस्त्र निर्मितीवर लक्ष दिलं.. सगळी रसद तिथंच पुरवली. या नादात सामान्य जनतेवर मात्र उपासमारीची वेळ आल्याचं ते म्हणाले... याच सगळ्या स्थितीत शाहबाज शरिफांनी भारतासोबत संबंध चांगले व्हावेत असं आवाहन पंतप्रधान मोदींना केलंय.